21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयमोदींनी केलेली विधाने विसरू नका

मोदींनी केलेली विधाने विसरू नका

एकमत ऑनलाईन

कोलकाता : कोरोनाचे संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते, अशी टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन केल्यानंतर मोदी सरकारवर केलेल्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे़ सेन हे म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असे मी म्हणणार नाही. पण त्यांनी मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी केलेली विधानंही आपण विसरायला नको, असे उत्तर पश्चिम बंगाल भाजपाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

मुंबईत राष्ट्र सेवा दलाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारच्या कृती कार्यक्रमावर टीका केली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. मात्र मोदी सरकार वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. कोरोनाचे संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्न होते, असे सेन म्हणाले होते.

सेन यांना समुपदेशनाची गरज
सेन यांनी केलेल्या टीकेवर भाजपाने उत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सेन यांच्यावर टीका केली आहे. संपूर्ण जगासमोर सेन मोदी सरकारवर टीका करू शकत नाही. त्यांनी मोदी सरकारवर केलेली टीका पूर्णपणे राजकीय होती, असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. सेन म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असे मी अहंकाराने म्हणणार नाही. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी केलेली विधानेही आपण विसरायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारविरुद्ध ते जे काही बोलले आहेत. ते पूर्णपणे राजकीयच आहे, अशी टीका भट्टाचार्य यांनी केली आहे.

ताडपत्रीची चोरी; सुवेंदू अधिकारीविरूध्द गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या