30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयबिहारी लोकांशी खोटे बोलू नका

बिहारी लोकांशी खोटे बोलू नका

राहुल गांधी ; बिहार निवडणुक प्रचारात मोदींवर टीका

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये आता राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही नवादामधील हिसुआ येथे सभा झाली. सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बिहारी लोकांशी खोटे बोलू नका, त्यांना किती रोजगार दिला हे सांगा ?… गेल्या निवडणुकीत २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले का?, असे खडे सवालच गांधी यांनी उपस्थित केले. जनमताचा कानोसा घेण्यासाठी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण कसे वाटले?, नीतीश कुमार यांचे सरकार तुम्हाला चांगले वाटले का? असे प्रश्न विचारले.

तुमच्यापुढे माथा झुकवतात ; काम श्रीमंतांसाठी करतात.
मोदी येतात आणि म्हणतात की मी शेतक-यांपुढे नतमस्तक होतो, लष्करापुढे नतमस्तक होतो, मजुरांपुढे माथा झुकवतो, छोट्या व्यापाºयांपुढे नतमस्तक होतो. त्यानंतर ते घरी जातात आणि अंबानी-अडानी यांच्यासाठी काम करतात. माथा तुमच्यापुढे झुकवणार आणि काम मात्र दुस-याच कोणासाठी तरी करणार, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

आम्ही शेतक-यांचे कर्ज माफ केले
राहुल गांधी पुढे म्हणाले की, नोटाबंदीमुळे तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही बँकांच्या समोर ऊन आणि पावसात उभे होतात. बँकेत पैसे जमा केले. तुमचा पैसा गेला कुठे? भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या खिशात तो पैसा गेला. अडाणी बँकेसमोर उभे होते का?, अंबानी बँकेच्या समोर उभे होते का? आमचे सरकार होते तेव्हा आम्ही ७० हजार कोटी रुपये माफ केले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबमध्ये शेतक-यांचे कर्ज माफ केले.’ ‘बिहारचे सैनिक सीमेवर शहीद झाले. त्यांच्यापुढे पंतप्रधान मोदी आपला माथा झुकवतात. मात्र प्रश्न हा आहे की, जेव्हा बिहारचे सैनिक शहीद झाले त्या दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी काय केले आणि काय म्हटले,’ असे राहुल गांधी यांनी विचारले.

ब्रेस्ट कॅन्सर पेशींना नष्ट करण्याचे प्रयोगशाळेतील संशोधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या