27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआगीशी खेळू नका - भाजपचा बॅनर्जी यांना सल्ला

आगीशी खेळू नका – भाजपचा बॅनर्जी यांना सल्ला

एकमत ऑनलाईन

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनात्मक बांधील आहेत. त्यांना घटनेचे पालन करावेच लागेल, असे राज्यपालांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसाठी ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार ठरवले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बाहेरचे उल्लेख करत भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, भारतीयांबद्दल बाहरेचे म्हणून बोलत आहेत का ? मुख्यमंत्री मॅडम आगीशी खेळू नका, असे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटले आहे़

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच, इतर भाजपा नेत्यांवर झालेला हल्ला आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फटकारले आहे. जे़ पी़ नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था गेल्या अनेक काळापासून खालावत चालली आहे. परिस्थिती चिंताजनक पातळीवर आहे, असेही ते म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बॅनर्जी यांनी उडविली नड्डा यांची खिल्ली
कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात, असेही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.

कुष्ठ, क्षयरोगाचे संशयित ४०५ रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या