22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचिनी बनावटीच्या कार भारतात विकू नका

चिनी बनावटीच्या कार भारतात विकू नका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर रोजी इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माता टेस्लाला भारतात चिनी बनावटीच्या कार विकू नयेत आणि त्याऐवजी त्यांनी भारतात त्यांचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी एलन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीला भारतात उत्पादित केलेल्या कार निर्यात करण्याची विनंती केली. त्यामुळे इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाची मेड इन चायना गाडीला भारतात प्रवेश असणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, या संदर्भात टेस्लाला सूचनाही दिल्या आहेत.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२१ ला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे. मी टेस्लाला सांगितले आहे की चीनमध्ये बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतामध्ये विकू नका. तुम्ही भारतात इलेक्ट्रिक कार तयार कराव्यात आणि त्यांची निर्यातही केली पाहिजे. तुम्हाला (टेस्ला) जे काही समर्थन हवे आहे ते आमच्या सरकारकडून पुरवले जाईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरींचा टाटा मोटर्सला पाठिंबा
नितीन गडकरींनी टाटा मोटर्सने तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारलाही पाठिंबा दिला आहे. टाटा मोटर्सने तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार टेस्ला वाहनांपेक्षाही कमी नाहीत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

आयात करसंबंधी चर्चा सुरू
टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कारद्वारे भारताच्या वाहन उद्योगात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. यापूर्वी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. एलन मस्क म्हणाले होते की भारतात आयात शुल्क खूप जास्त आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कर सवलतींशी संबंधित मागणीबाबत ते अजूनही टेस्ला अधिका-यांशी चर्चा करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या