21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयरुग्णाच्या घराबाहेर पोस्टर चिटकवू नका - सर्वोच्च न्यायालयाचा कोरोनाग्रस्तांना दिलासा

रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर चिटकवू नका – सर्वोच्च न्यायालयाचा कोरोनाग्रस्तांना दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमित रूग्णांच्या घराबाहेर पोस्टर चिकटवणे अनावश्यक बाब आहे. संबंधित अधिकाºयांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश दिला तरच हे पोस्टर्स लावता येतील, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या खंडपीठाने कोरोनाग्रस्त लोकांच्या घराबाहेर पोस्टर न लावण्याविषयीचा आदेश दिला.

सदर खटल्याचा निकाल लावताना न्यायमूर्ती आर. एस. रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी, केंद्राने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आधीच सांगितली आहेत़ त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अशी पोस्टर लावू नये. पोस्टर लावण्याचा हेतू कुणालाही कलंक लावण्याचा असू शकत नाही, असे जाहीर केले. याचिकेवर खंडपीठाने ३ डिसेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.

सदर याचिका दाखल करणारे कुश कालरा यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या घराबाहेर पोस्टर चिकटवण्याच्या बाबतीत मार्गदर्शक सूचनांमध्ये अशी कोणतीही सूचना नमूद केलेली नाही, असे म्हणत याबाबतची वास्तविकता खूप वेगळी असल्याचेही सांगितले.

मशिदी-मदरशांमध्ये मुलांवर दररोज बलात्कार – बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या