26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home राष्ट्रीय कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांच्या घराबाहेर ‘कोविड पॉझिटिव्ह’ अशी पोस्टर चिकटवली गेली तर या रुग्णांना अस्पृश्­यासारखे वागवले जाते, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने आज या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्­त केली. अशा प्रकारचा कोणताही नियम आखून दिलेला नाही. निरोगी व्यक्­तींच्या रक्षणासाठी अशा प्रकारे कोविड रुग्णांवर कलंक लावण्याचा कोणताही नियम केलेला नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. एकदा रुग्णांच्या घरावर अशा प्रकारची पोस्टर चिकटवली गेली, की या रुग्णांना अस्पृश्­यासारखी वागणूक मिळत असल्याचे निरीक्षण न्या. अशोक भूषण, न्या. आर सुभाष रेड्डी आणि न्या. एम़ आऱ शाह यांच्या खंडपीठाने सांगितले. त्यावर काही राज्ये स्वत: हून या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करीत आहेत, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पुढील सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.

कोविड-१९ बाधित रुग्णांच्या घरावर पोस्टर चिकटवली जात असल्याच्या संदर्भाने कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर अशी पोस्टर चिकटवली जाऊ नयेत, असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार का घेऊ शकत नाही, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली.

लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या