जैसलमेर, राजस्थान: भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान व चीनला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जवानांनी १९७१ च्या युद्धात पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्टवर सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली.
मोदींनी यावेळी जवानांना संबोधितही केले. पंतप्रधान मोदींनी नाव न घेता चीनला लक्ष्य केले. ‘आज संपूर्ण जग साम्राज्यवादी शक्तींमुळे चिंतेत आहे. साम्राज्यवाद एक मानसिक विकृती आहे. १८ व्या शतकातील मागास विचार त्यातून दिसून येतो. या विचाराविरोधात भारत एक प्रखर आवाज बनत आहे,’ असे म्हणत मोदींनी चीनवर निशाणा साधला.
सतर्कता हीच सर्वात मोठी सुरक्षा
दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना त्यांच्या घरात घुसून भारत मारत आहे. यामुळे भारत आपल्या हितांसाठी कुठल्याही स्थितीत समझौता करणार नाही हे जगाला आज ठाऊक झाले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध कितीही दृढ झाले तरी सतर्कता आणि जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. सामर्थ्य हेच विजयाचा विश्वास आहे आणि सक्षमतेतूनच शांतता प्रस्थापित होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास जवान सक्षम
पंतप्रधान मोदींनी यावेळी जवानांना आणि देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील प्रत्येक नागरिकाच्या शुभेच्छा तुमच्याकडे घेऊन आलोय. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यास आपल्याला आनंद येतो, असं मोदींनी सांगितलं. हिमालयाची उंच शिखरं, रखरखीत वाळवंट, घनदाट जंगल असो की खोल समुद्र, प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास जवान सक्षम आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अमेरिकेत एप्रिलमध्ये लस उपलब्ध