17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeराष्ट्रीयपहिल्या टप्प्यात २३ टक्के लोकांना डोस!

पहिल्या टप्प्यात २३ टक्के लोकांना डोस!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. भारताने लसीकरणात कोणाला प्रथम प्राधान्य द्यायचे, यांची निवड करायला सुरुवात केली आहे. जवळपास ३० कोटी लोकांना लसीकरणात प्रथम प्राधान्य मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

आघाडीवर राहून कोरोनाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, को-मोर्बिडीटी असणारे लोक आणि वयोवृद्धांना लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य मिळू शकते. ३० कोटी लोकांच्या लसीकरणासाठी जवळपास ६० कोटी लसीचे डोस लागणार आहेत. लस व्यवस्थापनासाठी बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीने अंमलबजावणीच्या योजनेचा आराखडा तयार केला आहे. केंद्रीय संस्था आणि राज्यांकडून इनपूटस् घेऊन त्यावर काम सुरू आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. पहिल्या टप्प्यात २३ टक्के लोकांचे लसीकरण करण्याची योजना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली आहे.

२ कोटींपेक्षा जास्त कर्मचा-यांचा समावेश
प्राधान्यक्रमाच्या यादीत एकूण चार गट आहेत. यात ५० ते ७० लाख आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आहेत. पोलिस, महापालिका कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान-अधिकारी असे मिळून २ कोटींपेक्षा जास्त लोक आहेत.

५० वर्षांपुढील २६ कोटी नागरिक
५० वर्षापुढील २६ कोटी नागरिक आणि ५० पेक्षा कमी वय पण को-मोर्बिडीटी असणा-या नागरिकांचा समावेश आहे. भारतात सध्या तीन लस चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. यात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस सर्वात शेवटच्या म्हणजे तिस-या फेजमध्ये आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला डाटा उपलब्ध?
भारतात या लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट या लसीची मानवी चाचणी करत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेज तीनचा डाटा उपलब्ध होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

भारतात मार्चपर्यंत मिळणार लस?
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या ३ महिन्यांत म्हणजेच मार्च २०२१ पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकते, असे ‘सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटले आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचा मुख्य उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. सीरमकडून या लसीच्या सध्या तिस-या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. कोरोनाचा फैलाव रोखणा-या लसीच्या निर्मितीसंदर्भात सीरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळ्या लस संशोधन करणा-या संस्थांबरोबर करार केले आहेत.

सीरमकडे डिसेंबरपर्यंत ७ कोटी डोस उपलब्ध!
डिसेंबर २०२० च्या अखेरीस सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीचे ६ ते ७ कोटी डोस असतील. पण परवान्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२१ मध्ये ते डोस बाजारात येतील. त्यानंतर आम्हाला सरकारच्या परवानगीने जास्तीत जास्त डोसचे उत्पादन करता येईल, असे डॉ. जाधव म्हणाले.

स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचणीला मान्यता
पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारतातील औषध नियंत्रकांनी डॉ. रेड्डी लॅबला ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या दुस-या आणि तिस-या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ रशियन लस आहे. जगात अधिकृत मान्यता देण्यात आलेली ही पहिली लस आहे. ऑगस्ट महिन्यातच रशियाने मानवी वापरासाठी या लसीला मंजुरी दिली होती. वेगवेळया केंद्रांवर आणि रँडम नियंत्रण परीक्षण पद्धतीने ही चाचणी करण्यात येणार आहे.

रेणा मध्यम प्रकल्प अजूनही तहानलेला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या