33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयड्रगनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?

ड्रगनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागील एका वर्षापासून अधिक काळ लडाखमध्ये भारतासोबत सुरु असणाºया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी लष्कराने उत्तराखंडजवळच्या बाराहोटी श्रेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एलएसीजवळ हलचाली वाढवल्याचे चित्र दिसत आहे. चीनच्या या कुरापतींमुळे भारतही सज्ज झालेला आहे. नुकतीच या ठिकाणी चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीमधील (पीएलए) जवानांची एक तुकडी सक्रीय असल्याचे दिसून आले. सुत्रांनी एएनआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच येथे पीएलएचे ३५ सैनिकांची एक तुकडी नजरेस पडली. ही तुकडी उत्तराखंडमधील बाराहोटी परिसराच्या आसपास सर्वेक्षण करताना दिसून आली. चीनच्या बाजूच्या प्रदेशामध्ये काहीजण दिसून आल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. चिनी सैनिक या ठिकाणी सर्वेक्षण करत असल्याचे दिसून आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने या सीमाभागामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे. सुरक्षा व्यवस्था आणि मागील काही दिवसांपासून या भागात चिनी सैनिकांचा वाढती हलचाल पाहून याठिकाणी काहीतरी करण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी भारतीय सैन्य आणि भारताची एकंदरित तयारी मजबूत असल्याने चीनला काही कुरापती करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. चीफ आॅफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि केंद्रीय सेना प्रमुख लेफ्टनंट जनरल व्हाय डिमरी यांनी नुकताच या ठिकाणी पहाणी दौरा केला. येथील परिस्थिती आणि एकंदरित कारभाराचा सर्व समीक्षा त्यांनी केली आहे़

एअर बेसही सक्रीय
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाराहोटी परिसराजवळ एका एअर बेसवर चिनी लष्कराच्या हलचाली वाढल्याचं दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने ड्रोन तैनात करण्यात आल्याचही भारतीय सुत्रांनी स्पष्ट केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने केंद्रीय क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. भारताने आपल्या नौदलालाही या परिसराच्या आसपासच्या काही एअर बेसवर सक्रीय केले आहे.

लडाख सीमेवर दोन लाख भारतीय सैनिक
गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने किमान ५०,००० अतिरिक्त सैनिक काही आठवड्यांपूर्वी भारत-चीन सीमेवर तैनात केले आहे. उत्तराखंड, लडाख आणि अरुणाचल असा चीनला लागून असणाºया तीन सीमांवर हे लष्कर तैनात करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दल सज्ज
गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत.

‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या