23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू घेणार सोमवारी राष्ट्रपतिपदाची शपथ

द्रौपदी मुर्मू घेणार सोमवारी राष्ट्रपतिपदाची शपथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला असून, मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून उद्या सोमवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजता शपथ घेणार आहेत.

सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. २० जून १९५८ रोजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात जन्मलेल्या द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. द्रौपदी यांनी त्यांचा नवरा आणि दोन मुले गमावली आहेत. त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे.

त्यांचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले. मात्र, त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही आणि भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. द्रौपदी मुर्मू आपल्या मुलीसाठी शिक्षिका म्हणून काम करू लागल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या