27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयडीआरडीओचा विस्तार होणार

डीआरडीओचा विस्तार होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचा(डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन ) लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती डीआरडीओने व्टिट करून दिली आहे. यामुळे डीआरडीओची व्याप्तीही वाढणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचा लवकरच विस्तार होणार आहे. देशभरातील सहा आयआयटीमध्ये डीआरडीओ आपली समन्वय केंद्र उभारणार आहे. डीआरडीओच्या या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे. डीआरडीओने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. डीआरडीओ देशभरातील सहा आयआयटीमध्ये उद्योग आणि शैक्षणिक समन्वय केंद्र उभारणार आहे. याला नुकतीच संरक्षण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. या समन्वय केंद्रामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या समन्वय केंद्रामुळे डीआरडीओलाही फायदा होणार आहे. समन्वय केंद्रामुळे डीआरडीओला अनेक कुशल असेल कर्मचारी मिळू शकतात. उद्योग आणि शैक्षणिक यामध्ये समन्वय साधून कुशल कर्मचारी तयार करण्याचा प्रयत्न डीआरडीओचा आहे.

हे आहेत देशातील सहा ठिकाणे
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओला सहा आयआयटीमध्ये समन्वय केंद्र उभारण्याची मंजूरी दिली आहे. यामध्ये हैदराबाद, जोधपूर, कानपूर, खरगपूर, रुरकी आणि बीएचयू या सहा आयआयटी केंद्राचा समावेश आहे. येथील विद्यार्थ्यांना डीआरडीओमध्ये आपले टॅलेंट सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

तंत्रज्ञानाचा जलद विकास होणार
राजनाथ सिंह यांनी समन्वय केंद्राला मंजूरी दिली आहे. आता यानंतर डीडीआरडीचे सचिव आणि संचालक, आयआयटी एमओयू यावर स्वाक्षरी करतील. त्यानंतर सीओईएस लवकरच याला कार्यान्वित करतील. सहा आयआयटीमधील समन्वय केंद्रे संरक्षण आणि सुरक्षेसाठी विशिष्ट आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या जलद विकासासाठी संशोधन करतील असे ट्वीट डीआरडीओने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या