28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयडीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार

डीआरडीओचे अँटी कोरोना औषध मंगळवारपासून मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डीआरडीओने (संरक्षण संशोधन व विकास संस्था) विकसित केलेल्या कोरोनाविरोधी औषधाला नुकतीच औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. आता दुसरी चांगली बातमी आली असून हे औषध मंगळवारपासून म्हणजे ११-१२ मे पासून उपलब्ध होईल, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी दिली आहे.

डीआरडीओने भारतीय संरक्षण क्षेत्रात अनेक नेत्रदीपक उपलब्धी प्राप्त केल्या आहेत. कोरोनाविरोधी लढ्यातही डीआरडीओने तेजस लढाऊ विमानांपासून ऑक्सिजन निर्मिती करुन दाखवली आहे. तिचा अवलंबही देशात सुरु झाला आहे. आता कोरोनाविरोधी औषधही २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) या नावाने निर्माण केले आहे. औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात. तसेच त्यांना बाहेरून द्याव्या लागणा-या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते, असा दावा डीआरडीओने केला आहे. रविवारी डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी हे औषध ११-१२ मे पासून बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असे सांगितले आहे. सुरुवातीला या औषधाचे १० हजार डोस बाजारात येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी हे औषध घ्यावे, असेही रेड्डी यांनी सांगितले आहे.

डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स (आयएनएमएएस) व हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) या दोन संस्थांनी संशोधन करून हे औषध बनवले आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज या औषधाचे उत्पादन करणार आहे.

तीनवेळा मानवी चाचण्या
औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात ११ रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुस-या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही, असे रेड्डी यांनी सांगितले.

औषधाची कार्यपद्धती
डीआरडीओचे २-डीजी हे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते, असे रेड्डी यांनी सांगितले.

कोणीही भारताला लेक्चर देऊ नये, फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या