24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू एअरफोर्स केंद्रावरील ड्रोन हल्ल्याचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सुपूर्द केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने दहशतवादी संघटनांच्या मदतीने हा ड्रोन हल्ला घडवून आणला असल्याचा अंदाज आहे. जम्मू येथील एअरफोर्स केंद्रावर ड्रोनद्वारे विस्फोटके टाकण्यात आली होती. यात एका इमारतीचे नुकसान झाले होते तर दोन कर्मचारी जखमी झाले होते.

ड्रोन हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली. ड्रोन हल्ल्यानंतर कोणतेही अवशेष पुरावे सापडले नाहीत. हल्ल्यात आरडीएक्सचा वापर केल्याचा तपास संस्थाचा संशय आहे. ड्रोन हल्ल्याच्या दुसºयाच दिवशी जम्मू येथील कालूचाक लष्करी केंद्राजवळ दोन ड्रोन दिसले होते. या ड्रोन्सना पाडण्यासाठी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला होता. ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू विभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बेकायदेशीर धर्मांतरासाठी ‘या’ ७ कोडवर्डचा वापर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या