23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा पर्दाफास!

गुजरातमध्ये ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा पर्दाफास!

एकमत ऑनलाईन

भरुच : गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करीत ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. यावेळी मारलेल्या छाप्यात मुंबई पोलिसांनी जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या अंमली पदार्थाची किंमत १०२६ कोटी रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह ७ जणांना अटक केली आहे.

मागील काही महिन्यापासून मु्ंबई पोालस दलाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अंमली पदार्थविरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईत काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर भागातून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी गोवंडीतील शिवाजीनगर येथून मार्च २०२२ मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून २५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ७०० किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास करताना अंमली पदार्थ पुरवठ्याचे धागेदोरे गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागात कारखान्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी ५१३ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या प्रकरणी ७ जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. त्यातील ५ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, तर दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपवण्यात आले.

ड्रग्ज तस्करांची आंतरराज्य टोळी?
अंमली पदार्थविरोधी पथकाने ७ जणांना अटक केली असून, ड्रग्ज तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी, असा पोलिसांनी संशय आहे. ही टोळी काही राज्यांत कार्यरत असून युवकांना लक्ष्य करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. उच्चभ्रू वर्तुळात एमडी ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

गुजरातमध्ये ६ महिन्यांत ५ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
गुजरात पोलिसांनी गेल्या ६ महिन्यांत एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत ४२२ गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ ६६७ ड्रग्स माफियांना तुरुंगात टाकले. त्यांच्याकडून २५ हजार ६९९ किलो ड्रग्ज जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ५ हजार कोटी रुपये आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या