24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये पुन्हा हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये पुन्हा हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त

एकमत ऑनलाईन

वडोदरा : गुजरात हे भारतातील बेकायदा ड्रग्ज तस्करीचे प्रमुख केंद्र बनल्याचे चित्र आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा हजारो कोटी रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरांवरुन जप्त करण्यात आले आहे. त्यात पुन्हा एकदा नव्याने ड्रग्ज पकडण्यात आले आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली यामध्ये १,१२५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन अशाच एका कारवाईत १२०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने वडोद-यातील एका बांधकाम सुरु असलेल्या फॅक्टरीवर मंगळवारी छापा टाकला इथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये २२५ किलो मेफेड्रोन ज्याची किंमत १,१२५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांनाही ताब्यात घेतले आहे अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलिस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिली.

प्रकल्प मालकांना अटक
जोशी यांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ भरुच येथील गुजरात औद्यागिक विकास महामंडळ अर्थात जीआडीसी सायखा इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्या फॅक्टरीमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे ते सुरत येथील महेश वैश्नव आणि वडोदरा येथील पियूष पटेल नामक व्यावसायिकांच्या मालकीचे आहे. तसेच राकेश मकानी, विजय वसोया आणि दिलीप वघासिया हे भरुच इथल्या प्रकल्पाचे मालक आहेत. या सर्व प्रकल्पाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या