25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउद्योगजगतप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व

प्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या रिव्  रिपोर्टनुसार केवळ २०२० मध्येच भारतातील ५ हजार कोट्यधीशांनी परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारले आहे. आता हा ट्रेंड कायम असून, कोरोना महामारीच्या काळात त्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत.

सरकारने भारतात नुकतेच हेवी टॅक्स धोरण आणले असून, यांचा सर्वाधिक फटका देशातील कोट्यधीश आणि अब्जाधिशांना बसत आहे़ त्यामुळे देशातील कोट्यधीश, अब्जाधीशांनी सरळ परदेशांची वाट धरली असून, तेथील नागरिकत्व स्वीकारायला सुरूवात केली आहे़ उच्च उत्पन्न गटात मोडणारे भारतीय उद्योगपती आपल्या मालमत्तेमध्ये वैविध्य राखण्यासाठी सुरक्षित आणि सोप्या गुंतवणूक पर्यायांकडे पाहत आहे. कोरोना महामारीच्या काळात दिसून आलेली आरोग्य सुविधांबाबतची अनिश्चितता आणि हल्लीच हेवी टॅक्स नियम लागू झाल्याने कोट्यधीशांचे देशातून पलायन वाढले आहे. तसेच प्रभावी भारतीय आपल्या कुटुंबाला चांगले आणि सुरक्षित राहणीमान देण्यासाठी बाहेरील देशांमध्ये जात आहेत. तसेच परदेशातून आपली आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे हाताळता येईल असा त्यांना विश्वास आहे.

२०२० मध्ये ५ हजार कोट्यधीश परदेशी
लंडनस्थित नागरिकत्व सल्लागार फर्म सीएस ग्लोबल पार्टनरच्या दाव्यानुसार श्रीमंत भारतीयांमध्ये गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत परकीय नागरिकत्वाचा शोध वेगाने वाढला आहे. भारतामध्ये ६ हजार ८८४ अतिश्रीमंत नागरिक आहेत. यामधील ११ अब्जाधीश आहेत. कोरोना महामारीच्या काळात ४० अब्जाधीश वाढले आहेत. आता देशामध्ये एकूण १५३ अब्जाधीश झाले आहेत. आता देशात एकूण १५३ अब्जाधीस आहेत. तसेच केवळ २०२० मध्ये देशातून पाच हजार करोडपती हे परदेशात गेले आहेत.

बदललेल्या धोरणांचा लाभ घ्यावा : अजमेरा
भारतीय वकील आणि मिनियनायर ऑन द मुव्हचे लेखक प्रशांत अजमेरा यांनी भारत सरकार कशाप्रकारे श्रीमंत भारतीयांना परदेशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे हे उलगडून सांगितले आहे. सरकारच्या बदललेल्या धोरणांचा या लोकांना लाभ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या