22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयमोदी सरकारच्या काळात ‘ईडी’च्या धाडी वाढल्या

मोदी सरकारच्या काळात ‘ईडी’च्या धाडी वाढल्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकिकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच सरकार आल्यापासून देशात ईडीचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जात आहे. असा आरोप सातत्याने केला जातो.

दरम्यान, ईडीने टाकलेल्या छाप्यांचा तपशील राज्यसभेत दाखल करण्यात आला. २००४-२०१४ च्या तुलनेत २०१४-२०२२ दरम्यान ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास २७ पट वाढ झाली आहे. अशी माहिती या तपशिलामध्ये देण्यात आली आहे.

मंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ईडी कारवाया का वाढल्या, याबाबत स्पष्टीकरणही दिलेले आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ईडीकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यामुळे २०१४ च्या आधी तपासात ढिलाईपणा आणि दिरंगाई करण्यात आली होती, तशी दिरंंगाई आणि ढिलाईपणा न करता वेगाने प्रकरण निकाली काढण्यासाठी ईडी कारवाया वाढल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४-२०२२ या वर्षात ३,०१० इतक्या ईडी कारवाया करण्यात आल्या. तर २००४-२०१४ या काळात अवघ्या ११२ ईडी कारवाया करण्यात आल्या होत्या, अशी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल २७ पटींनी ईडी कारवाया वाढल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मनी लॉन्डिंÑग कायदा आल्यानंतरच्या नऊ वर्षांच्या सुरुवातीच्या काळात तुलनेने कमी कारवाई करण्यात आल्याची आकडेवारीही समोर आली आहे. या काळात १०४ तक्रारी दाखल करण्यात आल्या. दरम्यान, या काळात कुणावरही दोष सिद्ध झाले नाहीत, अशीही माहिती लेखी उत्तरात देण्यात आली. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ही आकडेवारी समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या