36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयभ्रष्ट व अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी मोदी सरकारकडून आग्रह

भ्रष्ट व अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी मोदी सरकारकडून आग्रह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. याबाबत मोदी सरकारने अशा सरकारी कर्मचार्‍यांना ओळखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच, भ्रष्ट व अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठीही मोदी सरकारकडून आग्रह केला जात आहे.

सरकारी कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड केंद्रातील मोदी सरकार तपासणार आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. याअंतर्गत अक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जाईल. यात जे भ्रष्ट, अपात्र असल्याचे आढळतील, त्यांना निवृत्त होण्यास सांगितले जाईल. याबाबत, एक रजिस्टरही तयार करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याअंतर्गत केंद्र सरकारने सरकारी सेवेत ३० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ५०-५५ वर्ष असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची नोंद तपासण्यास सांगितले आहे. ३० वर्षे पूर्ण झालेल्या किंवा ५०-५५ वर्षे वयाच्या सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवेच्या नोंदीमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

कर्मचारी योग्यरित्या काम करीत आहेत की जनतेच्या हिताचा विचार करता त्यांना वेळेआधी निवृत्ती द्यावी, याबाबत सर्व्हिस रेकॉर्डचे परीक्षण केल्यावर निर्णय घेण्यात आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये या सर्व माहितीची नोंद केली जाईल. कर्मचारी योग्यरित्या काम करीत आहेत की जनतेच्या हिताचा विचार करता त्यांना वेळेआधी निवृत्ती द्यावी, याबाबत सर्व्हिस रेकॉर्डचे परीक्षण केल्यावर निर्णय घेण्यात आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये या सर्व माहितीची नोंद केली जाईल.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात उपचार दरम्यान दोघाजणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या