25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमधील अमृतसरमध्ये भूकंपाचे धक्के

पंजाबमधील अमृतसरमध्ये भूकंपाचे धक्के

एकमत ऑनलाईन

अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ४.१ इतकी होती. सोमवारी पहाटे ३ वाजून ४२ मिनिटांनी अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, भूकंपाचे केंद्र पंजाब, पाकिस्तानमध्ये होते. भूकंपाची खोली १२० किमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.

याआधी गेल्या एका आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये दोनदा भूकंपांचे धक्के जाणवले होते. १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले होते. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या