28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयगुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या पण पाणी वाचवा

गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या पण पाणी वाचवा

एकमत ऑनलाईन

रीवा : देशात अनेक पक्षाचे नेते अनेक प्रकारची विधाने करतात. अशातच भाजपच्या एका खासदाराने अजब-गजब असे वक्तव्य केले आहे. रीवामध्ये जल संवर्धन संदर्भात एका शिबिर आयोजन करण्यात आले होते. या भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या या अनोख्या व्यक्तव्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये ते म्हणतात की, नदी, नाले आणि तलाव आटत आहेत. पाण्याची पातळी दरवर्षी घसरत चालली आहे. पाण्याचा अतीवापर वाढत असताना हे होणारच पण आपल्याला पाणी वाचवायचे आहे. जेव्हा पैसा खर्च होणार, तेव्हाच पाणी वाचणार. तुम्हाला हवे ते करा पण पाण्याची बचत करा असे देखील जनार्दन मिश्रा यांनी म्हटले आहे. याआधी मिश्रा यांनी हातांनी शौचालयाची सफाई करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता ते त्यांच्या या अनोख्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आलेत.

पुढे ते म्हणतात की, प्रत्येक ठिकाणी नदी, नाले आणि तलाव यातील पाणी आटत चालले आहे. पाणी वाचवले पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा. पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, आणि पाण्याची बचत करा असे वक्तव्य जनार्दन मिश्रा यांनी केले आहे. मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या