नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नवनीत राणा यांची तब्येत आणखी बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार रवी राणादेखील त्यांच्यासोबत मुंबईत येणार आहेत. कोरोना झाल्याने नवनीत राणा नागपुरात उपचार घेत होत्या. आता त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखत असल्याची माहिती मिळत आहेत. कोरोना झाल्याने प्रथम त्यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते.
महावितरणने साधला परिमंडलातील ५० हजार ग्राहकांशी फोनद्वारे संपर्क