23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयअर्थव्यवस्था रुळावर, महागाईची मात्र चिंता

अर्थव्यवस्था रुळावर, महागाईची मात्र चिंता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था रूळावर आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल, अशी आशा आहे. मात्र, प्रत्यक्षात सामान्य माणूस महागाईच्या खाईत होरपळून निघत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत व्यापारातील तूट हळूहळू कमी होईल. वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने त्यांचा अहवालात जाहीर केला. या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली.

मॉर्गन स्टॅन्लेच्या प्रमुख उपासना छाच्छा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात क्रूड ऑईल वगळता कमोडिटीच्या किमती स्थिर होत्या. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. भारतासाठी मॅक्रो-अस्थिरतेचा काळ आता मागे पडला आहे. मात्र, महागाईचे संकट अजूनही भेडसावत आहे. तथापि, महागाई आणि व्यापार तूट हळूहळू कमी होईल. ऑगस्ट २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७ ते ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात तो ७ टक्के राहू शकतो. त्यानंतर त्यात घट होईल. वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण आणि पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे व्यापार संतुलन सुधारण्यास मदत होईल, असाही अंदाज वर्तवला गेला आहे.

महागाईचा दर ६.७१ टक्के
जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६.७१ टक्के राहिला आहे. सरकारने मार्च २०२६ पर्यंत महागाई दर ४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य आरबीआयला दिले आहे. यामध्ये २ टक्के अप-डाउन मार्जिन समाविष्ट आहे. जुलै महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती ८ टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ९२ डॉलरच्या पातळीवर आले आहेत. हे दरदेखील आणखी खाली येऊ शकतात.

इंधन दरवाढीमुळे महागाईचा फटका
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. बाजारातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या बजेटवर होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या