24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयराणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. या फ्लॅटची किंमत १२७ कोटी आहे.

लंडनमधील ७७ साऊथ ऑडली स्ट्रीटवर राणा कपूरचे आलिशान अपार्टमेंट आहे. या प्रॉपर्टीचे मूल्य १३.५ मिलियन पाउंड असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. कपूरने २०१७ मध्ये ९३ कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केले होते. येस बँक घोटाळा प्रकरणात कपूरने अनेक कंपन्यांना नियमबा कर्जे मंजूर केली आणि त्या बदल्यात त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांना जवळपास ४ हजार ३०० कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा आरोप आहे.

येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या प्रकरणात आता सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. येस बँकेने दिलेल्या कर्जाऊ रकमेचा गैरवापर करतानाच डीएचएफएलने हे कर्ज बुडवले. याबद्दल येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली व डीएचएफएलचे प्रवर्तक बंधू कपिल व धीरज वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

राणा कपूर, वाधवान बंधू सध्या सीबीआय कोठडीत
राणा कपूर व वाधवान बंधू सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. वाधवान यांना एप्रिल महिन्यात महाबळेश्वरहून ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघेही सध्या तळोजाच्या कारागृहात आहेत. येस बँकेने डीएचएफएलच्या रोख्यांमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात डीएचएफएलने डॉइट अर्बन या कंपनीला ६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. डॉइट अर्बन ही कंपनी राणा कपूर यांच्या मुलींच्या नावे आहे. पुढे हे कर्ज बुडित खात्यात गेले. या प्रकरणात पैशांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे.

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या