नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने दोन चिनी नागरिकांना मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. चार्ली पेंग आणि कार्टर ली अशी या दोघांची नावे आहेत. दोघांनाही १४ दिवसांसाठी ईडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे दोघेहीजण दिल्लीत राहून चिनी कंपन्यांसाठी फार मोठे हवाला रॅकेट चालवत होते व भारत सरकारला कोट्यवधींच्या महसुलाचे नुकसान पोहचवत होते.
मागील वर्षी चार्ली पेंगच्या ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने देखील चार्ली पेंग विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ईडीने चार्ली विरोधात आॅगस्टमध्येच मनी लॉण्ड्रिंगचा खटला दाखल केला होता. एवढ्या प्रदीर्घ काळापासून ईडी पेंगच्या सर्व संशयी व्यव्हारांवर नजर ठेवून होती. तपासात पेंगचा समावेश केवळ भारतातील हवाला कारभारात सहभाग नव्हता तर, तो तिबेटी धर्मगुरू दलाई लामांची देखील हेरगिरी करत होता, असे आढळून आले आहे.
शेतकरी आंदोलनाशी संबंधित नेत्याला समन्स