27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयईडीकडून दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

ईडीकडून दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे. देशातील ३० ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर मोठ्या प्रमाणावर भाजपकडून टीका सुरू होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनौ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे.

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात ३० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. ईडीच्या मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या छापे टाकण्यात आलेले नाहीत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर प्रदेशातील लखनौ, हरियाणातील गुरुग्राम, चंदीगढ, मुंबई, हैदराबाद , बंगळुरूमध्ये अजूनही छापेमारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथके दिल्ली तील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीने छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे एमडी आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या