24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयचौताला यांच्या संपत्तीची ‘ईडी’द्वारे चौकशी

चौताला यांच्या संपत्तीची ‘ईडी’द्वारे चौकशी

एकमत ऑनलाईन

चंडीगड : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना २६ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी चौटाला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

ईडीने २०१९ मध्ये चौटाला यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यात फ्लॅट, प्लॉट आणि जमीन यांचा समावेश होता. ही संपत्ती नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरमा येथील आहे. मनी लाँंिड्रग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानतर ही कारवाई झाली होती. चौटाला यांना यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी भरती घोटाळ्यातही १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या