श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री खासदार फारूक अब्दुल्ला यांची मंगळवारी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली.
हे प्रकरण जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. खासदार अब्दुल्ला सकाळी ११ च्या सुमारास राजबाग येथील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहोचले. चौकशीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.