22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयफारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे़ जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या कोषातील अनियमितता प्रकरणात ही चौकशी सुरू आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यासहीत आणखीन तिघांविरोधात श्रीनगरच्या एका न्यायालयात काही महिन्यांपूर्वी क्रिकेट संघाच्या कोषातील घोटाळ्यासंबंधी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

ईडीची ही चौकशी सीबीआयद्वारे काही कोटींच्या घोटाळ्यासंबंधी दाखल झालेल्या एफआयआरशी निगडीत आहे. बीसीसीआयने २००२ ते २०११ दरम्यान राज्यात क्रिकेट सुविधांच्या विकासासाठी ११२ कोटी रुपये दिली होते. आरोपानुसार, यातील ४३.६९ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात चौकशी समितीने जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, तत्कालीन महासचिव मोहम्मद सलीम खान, तत्कालीन कोषाध्यक्ष अहसान अहमद मिर्झा आणि जेअ‍ॅन्डके बँकेंचे एक कर्मचारी बशीर अहमद मिसगर यांच्यावर फसवणुकीचा आरोप लावला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लॉन्ड्रींगच्या आरोपांखाली चौकशी सुरू करण्यात आली होती.

नासा बसवणार चंद्रावर ४ जी नेटवर्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या