22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशभरात ईडीचे ४० ठिकाणी छापे

देशभरात ईडीचे ४० ठिकाणी छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीत दारू धोरणावरून गदारोळ सुरु असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने ४० ठिकाणी छापे टाकले आहेत. तर, हैदराबादमध्ये ही २५ ठिकाणी छापा सत्र सुरू आहे. दारू धोरण घोटाळयाप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची आज ईडी चौकशी करणार आहे.

दारू धोरण घोटाळा प्रकरणी विशेष सीबीआय न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी गुरुवारी ईडीला सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. न्यायालयाने ईडीच्या पथकाला तिहार तुरुंगातच चौकशी करण्यास सांगितले आहे. जैन यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून ४० ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

सिसोदियांच्या मागे ससेमिरा
६ सप्टेंबरलाही ईडीने दिल्ली, यूपी, पंजाबसह अनेक राज्यांतील दारू व्यापा-यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. गुरुग्राम, लखनौ, हैदराबाद, मुंबई, बंगळुरूसह सुमारे ३५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दिल्लीतील दारू घोटाळ्याचे राजकारण संपण्याचे नाव घेत नाही. सीबीआय तपासासोबतच भाजप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मनीष सिसोदिया यांच्या घराबाहेर भाजप नेत्यांनी निदर्शनेही केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या