18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयदिल्ली, पंजाबमध्ये ईडीचे छापे

दिल्ली, पंजाबमध्ये ईडीचे छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील तब्बल ३५ ठिकाणांवर आज ईडीच्या अधिका-यांनी छापे टाकले आहेत. कथित दारूघोटाळा (अबकारी मनी लाँडरिंग) प्रकरणी ईडीने दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद येथील ३५ ठिकाणांवर छापेमारी केली. तर या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या छापेमारीनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की मागच्या ३ महिन्यांपासून ५०० हून अधिक छापे तर ३०० हून अधिक सीबीआय/ईडी अधिकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी २४ तास काम करत आहेत. या तपासात काहीही सापडले नाही कारण काहीही झाले नव्हते. इतक्या अधिका-यांचा वेळ त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी वाया जात आहे. अशा देशाची प्रगती कशी होणार? अशा शब्दांत केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर मागच्या काही दिवसांपासून आप सरकारवर भाजप सरकारकडून निशाणा साधला जात आहे. त्यामुळे मनिष सिसोदिया यांच्यावरही आरोप करण्यात आले असून याप्रकरणी त्यांची चौकशी चालू आहे. तर त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या