30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयपीएफआयच्या कार्यालयावर ईडीचे छापे

पीएफआयच्या कार्यालयावर ईडीचे छापे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शहरातील राज्य कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली. सुमारे अडीज तास कार्यालयाची झाडाझडती घेऊन आणि दोन पदाधिका-यांची चौकशी करून पथक परतले. तसेच केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलामराम यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापा टाकला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे महाराष्ट्र कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन सकाळी १० वाजता धडक मारली. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना गुरुवारी अमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी इश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इर्फान मिली आणि कलीम यांची अधिका-यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.

आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदपत्रे जप्त
उच्च शिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कुठून येतो. संस्थेचे देणगीदार कोण आहे? कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयावर नियंत्रण ठेवले जाते? यासह अन्य मुद्यावर चौकशी केली. यावेळी ईडीच्या अधिका-यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबूक बँक स्टेटमेंट आदी कागदपत्रासह संस्थाच्या विविध उपक्रमाबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन चौकशी केली. कार्यालयात जप्त कागदपत्राविषयी आणि झडतीबद्दल पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे.

आंदोलनकर्त्या शेतक-यांची होणार कोरोना चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या