16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयईडीची टीआरएस मंत्र्यांच्या घरी झडती

ईडीची टीआरएस मंत्र्यांच्या घरी झडती

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : ग्रेनाइट घोटाळ्यासंबंधी मनी लाँड्रिग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने गुरुवारी तेलंगणाती टीआरएस सरकारचे मंत्री गंगुला कमलाकर यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले. करीमनगर व परिसरात ही कारवाई करण्यात आली.

ग्रेनाइट व्यापारातील कथित गैरव्यवहारावरून ईडीने या आधीच गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणासोबतच ईडीने तामिळनाडूत पोलिस महासंचालक एमएम जाफर सैत यांच्या पत्नी परवीन जाफर, मुख्यमंत्री करुणानिधी यांचे सचिव राहिलेल्या राजमणिकम यांचे पुत्र आर. दुर्गाशंकर व लँडमार्क कन्स्ट्रक्शन चेन्नईचे टी उदयकुमार यांची १४.२३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या