24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयखाद्यतेल आणखी स्वस्त होणार

खाद्यतेल आणखी स्वस्त होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्राने आता दुस-यांदा तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. या निर्णयामुळे पामतेलासह अन्य खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्कात कपात करत ते ३५.७५ टक्क्यांवरुन ३०.२५ टक्क्यांवर आणले आहे. तर रिफाईंड पाम तेलावरील आयात शुल्क ४९.५ टक्क्यांवरुन ४१.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. यामुळे बाजारातील खाद्यतेलाच्या किमती कमी होतील, असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने म्हटले आहे. सरकारने याआधी १७ जून २०२१ रोजी पाम तेलावरील आयात शुल्कात प्रतिटन ८००० रुपयांची कपात केली होती. क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क ८६ डॉलर प्रतिटनामागे कमी करण्यात आले होते. आता १४ दिवसांत दुस-यांदा तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. मागणीच्या तुलनेत खाद्य तेलाचे देशांतर्गत उत्­पादन पुरेसे नाही.

सर्वसामान्यांना किंचित दिलासा
भारतात देशांतर्गत मागणीच्या फक्­त ४० टक्­के इतक्­या तेलाचे उत्­पादन होते. देशातील मागणी आणि पुरवठयातील तफावत दूर करण्यासाठी परदेशातून ६० टक्­के तेलाचे आयात करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्­या एक वर्षात खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्­यामुळे देशातील तेलाचा दरातही वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या असल्या, तरी स्थानिक बाजारातील तेलाच्या किंमती वाढण्यामागे साठेबाजी एक मोठे कारण असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

बेकायदेशीर धर्मांतरावरून बीडचा इरफान शेख अटकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या