24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeराष्ट्रीयबिहार सत्तापरिवर्तनाचा परिणाम राज्यसभेतील पक्षीय समीकरणावर

बिहार सत्तापरिवर्तनाचा परिणाम राज्यसभेतील पक्षीय समीकरणावर

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होताच याचा थेट परिणाम भाजपच्या संख्याबळावर आणि राज्यसभेतील समीकरणावर होणार आहे. आता राज्यसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संख्याबळात किंचित घट होणार आहे. त्याचवेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याबाबत संभ्रम आहे. बहुधा ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत.

हरिवंश हे जेडीयूच्या कोट्यातून आणि भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेचे उपसभापती झाले. आता जेडीयू ‘एनडीए’ बाहेर पडलेली असताना ते उपसभापतीपदाचा राजीनामा देणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र, यासंदर्भात हरिवंश यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. ३०३ सदस्यांसह भाजप हा लोकसभेतील एकमेव सर्वात मोठा पक्ष नाही, तर दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. इथे भाजपला विधेयक मंजूर करण्यासाठी दुस-या पक्षाची गरज नाही. मात्र, लोकसभेत विधेयक मंजूर करताना एनडीएसह इतर काही पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या