22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकृषी आणि उद्योगांवर महागाईचा परिणाम

कृषी आणि उद्योगांवर महागाईचा परिणाम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, सन्मानाबाबत वक्तव्य केले. मात्र, दुस-याच दिवशी गुजरातमध्ये भाजपच्या सरकाराने बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचे काम केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. २०१४ मध्ये घरगुती गॅसचे दर हे ४१० रुपयांवर होते ते आज १००० रुपयांवर गेले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्याकिंमती आज १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. तसेच याचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर झाला असल्याचे पवार म्हणाले. रोजगार कमी झाले असल्याचेही पवार म्हणाले.

शेतक-यांवर कोणतही संकट आल्यानंतर आपल्याला सतर्क राहणे गरजेचे आहे. शेतक-यांसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले. सांप्रदायिक शक्तिविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे असेही शरद पवार म्हणाले. आज देशातील नागरिकांसमोर वाढती महागाई ही मोठी समस्या आहे. महागाईचा दर वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, खायच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पवार म्हणाले. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ व्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीपुढे झुकले नाहीत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला तर आपल्याला समजते की ते दिल्लीच्या सत्तेसमोर कधीही झुकले नाहीत. शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर हे आमचे आदर्श असल्याचे शरद पवार म्हणाले. आज दिल्लीच्या ऐतिहासिक मैदानावर आपण सगळे एकत्र आलो आहोत. बाजीराव पेशवे पुण्यातून दिल्लीत आले होते. त्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिल्याचे पवार म्हणाले. गेल्या ७५ वर्षात देशावर अनेक संकटे आली असल्याचे पवार म्हणाले. या काळात देशात खूप बदल झाल्याचा उल्लेख देखील पवारांनी केला.

जगाला अन्न पुरविण्याचे काम भारत करतोय
देशातील ५६ टक्के लोकसंख्या शेती करत आहे. देशाला अन्न पुरवण्याचे काम शेतकरी करत आहेत. जगातील अनेक देशात अन्नधान्य पुरवण्याचे काम भारतातील शेतकरी करत असल्याचे पवार म्हणाले. पण दुर्दैवाने देशात शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले होते. हे कायदे १५ मिनीटात संसदेत पारित केले होते. याविरोधात एक वर्ष दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांनी आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाला भाजपने विरोध केला. निर्दोष शेतक-यांवर कारवाई केल्याचे पवार म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सतत शेतक-यांच्या हिताचे रक्षण करेल असेही पवार यावेळी म्हणाले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या