23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयगोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता

गोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला(आप) निवडणूक आयोगाकडून गोव्यात ‘राज्य मान्यताप्राप्त पक्ष’ असा दर्जा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याचवेळी आम्हाला दुस-या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून घोषित केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गोवा विधानसभेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मतदानाच्या कामगिरीच्या पुनरावलोकनाच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की, आम आदमी पक्ष सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आहे. झाडू हा त्यांचा आरक्षित चिन्ह आहे. गोव्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या पॅरा ६ अ मध्ये घातलेल्या अटी पूर्ण करतो. आयोगाच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षाला गोवा राज्यातील निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे.

लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषीत होणार
दिल्ली आणि पंजाबनंतर आता गोव्यातही आप हा राज्य मान्यताप्राप्त पक्ष आहे. दुस-या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले जाईल. मी प्रत्येक स्वयंसेवकांचे त्यांच्या मेहनतीबद्दल अभिनंदन करतो. आप आणि तिच्या विचारसरणीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या