19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयफिक्कीच्या संचालक मंडळावर ललित गांधी यांची निवड

फिक्कीच्या संचालक मंडळावर ललित गांधी यांची निवड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीजच्या (फिक्की) कार्यकारी समिती संचालकपदी ललित गांधी सलग तिस-यांदा निवडणुकीत विजयी झाले.

या निवडीचा कालावधी तीन वर्षासाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. ललित गांधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्री.चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या ९५ व्या वार्षिक सभेत ही निवडणूक झाली. फिक्कीसारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावितात. देशाच्या अर्थविषयक आणि उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणा-या फिक्कीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांनाही अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या