29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयबंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार

बंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज दुस-या टप्प्यातले मतदान सुरू असताना मतदानाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. विशेष म्हणजे बंगालमधील अतिशय हायप्रोफाइल नंदीग्राम मतदारसंघाचाही यात समावेश आहे. या हिंसाचारातही सकाळी सकाळी ११.३१ पर्यंत ३७.४२ टक्के मतदान झाले होते़ सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.

पश्चिम बंगालमधील केशपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांच्या कारवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला आहे. यासोबतच १७३ क्रमांकाच्या बुथवरील भाजपच्या एका पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आली. या पोंिलग एजंटला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे.

याशिवाय प्रसार माध्यमांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील कमलापूरच्या १७० व्या मतदान केंद्राजवळ हा हल्ला झाला आहे. या हिंसक घटनांवरून भाजप नेते आणि नंदीग्राममधील पक्षाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीवर निशाणा साधला आहे. हे हल्ले पाकिस्तानी समर्थकांचे आहेत. जय बांगला ही घोषणा बांगलादेशातील आहे. काही समाजातील मतदार हे असे हल्ले करत आहेत, असा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला.

टीएमसी कार्यकर्त्याची हत्या
तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अट केली आहे. तर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बुथ ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. देबरा मतदारसंघातील भाजपचे मंडल अध्यक्ष मोहन सिंग यांना पोलिसांनी अटक केली आहे. देबरामधील भाजपच्या उमेदवार भारती घोष या मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना प्रभावित करण्याता प्रयत्न करत असल्याचा आरोप, टीएमसीने केला आहे.

ममतांचा थेट राज्यपालांना फोन
ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणा मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात प्रवेश करु देत नसल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील मतदान केंद्राबाहेर आंदोलनच सुरु केले आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट राज्यपालांना फोन केला आणि स्थानिकांना मतदान करु दिले जात नसल्याची तक्रार केली.

सुटीच्या दिवशीही मिळणार लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या