29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयदिल्लीतील सर्व बाबुंना इलेक्ट्रिक कार अनिवार्य

दिल्लीतील सर्व बाबुंना इलेक्ट्रिक कार अनिवार्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील सर्व सरकारी अधिकाºयांना आता इलेक्ट्रिक कारचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांनी ही घोषणा केली आहे. आगामी सहा महिन्यात सर्व सरकारी अधिकाºयांना इलेक्ट्रिक कार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली प्रदुषणमुक्त करण्याचे ध्येय आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम सर्व सरकारी अधिकाºयांना इलेक्ट्रिक कार वापरणे अनिवार्य केले आहे. आपल्या सर्व अधिकाºयांना इलेक्ट्रिक कारची सक्ती करणारे दिल्ली सरकार हे देशातीलच नव्हे तर जगातील पहिलेच सरकार असल्याचेही शिसोदिया यांनी म्हटले आहे.

नुकतीच केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कृषि विकास अधिभार लावण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रोज इंधनाच्या दरात वाढ होत असून पेट्रोल अनेक शहरात १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहे. देशभरात इंधनाच्या वाढत्या किंमतींवरुन जनतेचा आक्रोश वाढत आहे. त्याबाबत बोलताना केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी आता इलेक्ट्रिक कारचा वापर करणे काळाची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच सर्व सरकारी अधिकाºयांसाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करण्याचे सुतोवाच केले होते.

दिल्लीत वायू प्रदुषणाचीही मोठी समस्या
दुसरीकडे दिल्लीतही पेट्रोलच्या किंमती १०० रुपये प्रतिलिटर पर्यंत गेल्या आहेत. तसेच दिल्लीत वायू प्रदुषणाचीही समस्या उग्र रुप धारण करुन आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे मनिष शिसोदिया यांनी सांगितले आहे.

जणगणनेतील ओबीसींची आकडेवारी प्रसिद्ध करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या