24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये विजेचा झटका लागून हत्तीचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये विजेचा झटका लागून हत्तीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

चौकशी समिती ही स्थापन करण्यात आली; विद्युत तारेची उंची 5 ते 6 फूट , ज्यात अडकला होता हत्ती

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये गेल्या 60 तासांच्या आत तीन हत्तींचा मृत्यू झाला आहे. असे असताना मंगळवारी सकाळी येथील धमतरी येथे एका लहान हत्तीचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. एकामागून एक झालेल्या हत्तींच्या मृत्यूमुळे येथील वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येत आहे. यासाठी चौकशी समिती ही स्थापन करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरमजयगड येथील गेरसा जंगलाला लागून असलेल्या गावाच्या हद्दीत एक नर हत्ती शिरला होता. हा हत्ती गावातील एका शेतात शिरला. जिथे विद्युत तारेचा झटका लागून हत्तीचा मृत्यू झाला. डीएफओ प्रियंका पांडे यांनी सांगितले की, विद्युत तारेची उंची 5 ते 6 फूट होती. ज्यात हत्ती अडकला होता. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Read More  भारतीय उच्चायोगातील कर्मचार्‍यांचा खुलासा – PAK पोलिसांनी रॉडने केली मारहाण, घाणेरडे पाणी दिले प्यायला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या