26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयजैशचा दहशतवादी ‘लंबू’चा खात्मा

जैशचा दहशतवादी ‘लंबू’चा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, याबाबत काश्मीर विभागीय पोलिस आयजीपी विजय कुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जैशशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी लंबूचा खात्मा चकमकीत करण्यात आला. दुस-या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या कारवाईसाठी लष्कर आणि अवंतीपूर पोलिसांचे अभिनंदनही विजय कुमार यांनी केले.

लंबू हा जैशचा संस्थापक मसूद अजहर याच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये लंबू आतंरराष्ट्रीय सीमेवरून काश्मीरमध्ये आला होता त्याचे दुसरे कोड नेम सैफुल्ला असे होते. जैशकडून त्यांच्या कमांडर्सना अशा प्रकारचा कोड दिला जातो. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा अबू सैफुल्ला उर्फ लंबू २०१९ ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात कट रचणा-यांपैकी एक होता. हल्ल्यासाठी आयईडी त्यानेच तयार केल्याचे म्हटले जात आहे.

शनिवारी राबविली मोहीम
सुरक्षा दलांनी दहशतवादी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी शोधमोहिम सुरु केली. त्यावेळी शोधमोहिम करणा-यांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला. तेव्हा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले.

मोदी, शहांविरोधात अवमान याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या