35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयलज्जास्पद घटना : विधवा महिला आणि दिव्यांग मित्राचं मुंडण करून तोंडाला फासलं...

लज्जास्पद घटना : विधवा महिला आणि दिव्यांग मित्राचं मुंडण करून तोंडाला फासलं काळं

एकमत ऑनलाईन

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या कनौजमध्ये धक्कादायक, लज्जास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलीय. इथं एका विधवा महिलाला आणि तिच्या दिव्यांग मित्राचं मुंडण करून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. त्यानंतर या दोघांची चप्पलांची माळ घालून गावभर धिंड काढण्यात आली. ही घटना बुधवारी सगळ्या गावाच्या साक्षीनं घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आलीय.

धक्कादायक म्हणजे, राजधानी लखनऊपासून अवघ्या १२२ किलोमीटर अंतरावर ही घटना घडलीय. महिलेच्या नातेवाईकांनीच तिची आणि तिच्या मित्राची ही अवस्था केल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिला विधवा आहे. दोन महिन्यांपूर्वीच तिच्या पतीनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. त्यानंतर जवळच राहणारा ४० वर्षीय एक दिव्यांग व्यक्ती तिची मदत करत होता. परंतु, महिलेची आणि पुरुषाची ही मैत्री महिलेच्या नातेवाईकांना खुपत होती. त्यामुळे त्यांनीच अपमानित करण्यसाठी ही लज्जास्पद घटना घडवून आणली.

घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये महिला आणि दिव्यांग व्यक्तीचं मुंडण करण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर त्यांच्या चेह-यावर काळं फासून त्यांना गावातल्या एका छोट्या गल्लीतून फिरवण्यात आल्याचंही आणि आजूबाजूला मोठी गर्दी असल्याचंही यात दिसून येतंय. टवाळकी करत या घटनेला साथ देणारे पुरुष आणि लहान मुलंही हसताना दिसणारा हा व्हिडिओ या समाजाचा खरा आणि क्रूर चेहरा उघड करतोय.

बॉलिवूडमधील नवा प्रवाह

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या