34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइंडिगो विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग

एकमत ऑनलाईन

कराची : भारतीय विमान कंपनी इंडिगोच्या एका विमानाची मंगळवारी पाकिस्तानच्या कराची विमानतळावर इमर्जन्सी लँंिडग करावी लागली. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने विमानाचा मार्ग बदलून तातडीने पाकिस्तानच्या कराची विमानतळावर उतरवण्यात आले. पण दुर्दैवाने तरीही प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.

इंडिगो प्रशासनाने या घटनेबाबत माहिती दिली आहे. शारजावरुन लखनौला जाणाºया विमान क्रमांक ६ ए १४१२ ला मेडिकल इमर्जन्सीमुळे पाकिस्तानच्या कराचीकडे वळवण्यात आले. प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने इंडिगोच्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी कराची विमानतळाकडे परवानगी मागितली होती. पण दुर्दैवाने प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. विमानतळावर लँडिंगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाला मृत घोषीत केले, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे.

शेतमालावर प्रक्रियेसाठी क्रांतीची गरज – नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या