वाराणसी : वाराणसीमध्ये विस्तारा एअरलाइनच्या विमानाचा मोठा अपघात टळला. वाराणसीहून मुंबईला जाणा-या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. वाराणसीमध्ये या इमर्जन्सी लँडिंगचे कारण हवेत पक्षी विमानाला आदळल्याचे सांगितले जात आहे.
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा ए-३२० विमान व्हीटी-टीएनसी ऑपरेटिंग फ्लाइट यूके-६२२ (वाराणसी-मुंबई) हवेत एका पक्ष्याला धडकले. यानंतर विमान वाराणसीला परत वळवण्यात आले. विमान वाराणसीत सुरक्षित उतरले असून राडोमचे नुकसान झाले असून या विमानाला एअरक्राफ्ट ऑन ग्राऊंमड म्हणून घोषित करण्यात आले आहे. वाराणसीमध्ये विस्तारा एअरलाइनच्या विमानाचा मोठा अपघात टळला. वाराणसीहून मुंबईला जाणा-या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. वाराणसीमध्ये या इमर्जन्सी लँडिंगचे कारण हवेत पक्षी विमानाला आदळल्याचे सांगितले जात आहे.