21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयमॉडर्ना लसीला आपत्कालीन परवानगी

मॉडर्ना लसीला आपत्कालीन परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. भारतात आतापर्यंत ४० कोटीहून अधिक नागरिकांनी लसीचे डोस देण्यात आलेत. मात्र लसींच्या कमतरतेमुळे बºयाच ठिकाणी लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. ज्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रातून लस न घेताच परतावे लागत आहे. मात्र यात एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआई) अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

ज्यामुळे कोरोनाविरोधात आता मॉडर्ना लसीचे दोन डोस नागरिकांना दिले जाणार आहेत. १८ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. कमी मात्रा असणाºया मॉर्डना लसीचे डोस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी सक्षम असतील असे मॉडर्नाने म्हटले आहे. मुंबईतील सिप्ला या औषध निर्माती कंपनी मॉर्डना लसीचे डोस अमेरिकेतून आयात करणार आहे.

सद्यस्थितीत भारतात तीन लसींचा वापर
गेल्या काही महिन्यांत अनेक देशांमध्ये मॉर्डना लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली. कारण कोरोना विषाणू रोखण्यास ही लस अधिक प्रभावी ठरत असल्याचे म्हटले जात आहे. आता भारतातही या लसीच्या वापरास लवकरंच सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारतात नागरिकांसाठी सध्या तीन लसींचा वापर केला जात आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एसआयआय)ची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा समावेश आहे.

 

शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या