24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयविमानाच्या इंजिनला आग

विमानाच्या इंजिनला आग

एकमत ऑनलाईन

विमानाच्या इंजिनला आग;
१८५ प्रवासी बचावले
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँंिडग करण्यात आले. विमानाच्या इंजिनला आग लागल्याने ही लँडिंग करण्यात आली. दिल्लीला जाणारे हे विमान पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर उतरवण्यात आले. या विमानात १८५ प्रवासी होते, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

या विमानाने पाटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी १२.१० वाजता उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाच्या पंख्याला आग लागली. आश्­चर्यकारक बाब म्हणजे या विमानाच्या पंख्याला आग लागल्याचे लोकांनी खालून पाहिले.

दरम्यान, पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, विमानाच्या पंख्याला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी जिल्हा आणि विमानतळ अधिका-यांना दिली. यानंतर तात्काळ दिल्लीला जाणारे हे विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. या तांत्रिक बिघाडामागचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या