22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयईएमआयचे ओझे आणखी वाढणार?

ईएमआयचे ओझे आणखी वाढणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे दर-निर्धारण पॅनल पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत प्रमुख रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती एका अमेरिकन ब्रोकरेजने उघड केली. त्यामुळे कर्जदारांच्या ईएमआयमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याची झळ कर्जदारांना बसू शकते.

रेपो दरात वाढ झाल्याने धोरणात्मक भूमिका जाणीवपूर्वक कडक केली जाऊ शकते. एमपीसीच्या बैठकीपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. समितीची बैठक ३ ऑगस्टपासून सुरू होणार असून ५ ऑगस्ट रोजी पतधोरणाचा आढावा सादर केला जाणार आहे.

एप्रिलच्या पतधोरण आढाव्याचा संदर्भ देत ब्रोकरेज कंपनीने सांगितले की, मध्यवर्ती बँकेने पॉलिसी दरात १.३० टक्क्यांनी प्रभावीपणे वाढ केली आहे. त्यावेळी सर्वोच्च बँकेने कायमस्वरूपी ठेव सुविधा सुरू केली होती. अहवालानुसार चलनविषयक धोरण समिती रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढून ५.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे प्री-कोविड पातळीपेक्षा जास्त आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या