24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयमराठीसह ११ भाषांमध्ये मिळणार इंजिनिअरिंगचे शिक्षण

मराठीसह ११ भाषांमध्ये मिळणार इंजिनिअरिंगचे शिक्षण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंजिनिअरिंग म्हटले की इंग्रजी भाषा आपसुकच आली यामुळे अनेक विद्यार्थी इच्छा असून सुध्दा केवळ इंग्रजीच्या भीतीने इंजिनिअरिंगला प्रवेश घेत नाहीत़ आता मात्र इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, देशात मराठीसह ११ भाषांमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे़

बी.टेक करू इच्छिणा-या लाखो तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ११ स्थानिक भाषांमध्ये बी. टेकच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, आसामी, पंजाबी आणि उडिया या ११ भाषांमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. अनेक तरुणांच्या मनात इंजिनिअर होण्याचे स्वप्न असते.

पण, इंग्रजी भाषेमुळे तरुण इंजिनिअरिंगचा नाद सोडून देतात किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर इंग्रजी डोक्यावरुन जात असल्याने मध्येच शिक्षण सोडून देतात. पण, आता स्थानिक ११ भाषांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणे शक्य असल्याने तरुणांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकणार आहेत आणि आपले स्पप्न साकार करू शकणार आहेत.

विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी निर्णय : प्रधान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, एआयसीटीईने ११ स्थानिक भाषांमधील अभ्यासक्रमास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रांतिक भाषेमध्ये तरुणांना शिक्षण देण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. राष्ट्रीय शिक्षण नीतीनुसार विविध भागातून येणा-या विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला आहे.

उपराष्ट्रपतींकडून निर्णयाचे स्वागत
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आठ राज्यातील १४ इंजिनिअरिंग कॉलेजच्या नव्या शैक्षणिक वर्षांपासून निवडक शाखांमध्ये प्रांतिक भाषांमध्ये अभ्रासक्रम सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल.

लातूर जिल्ह्यात ३४ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या