26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयइंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षणाची सोय

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षणाची सोय

केंद्रसरकारचा निर्णय : निवडक आयआयटीमध्ये होणार सुरुवात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रसरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यातबाबत निर्णय घेतला आहे.पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) देशातील काही निवडक आयआयटी आणि एनआयटीमधून मातृभाषेतून शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘अभियांत्रिकी शिक्षणाबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे. देशातील निवडक आयआयटी आणि एनआयटी संस्थांची यासाठी निवड करण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

जेईईची परीक्षाही मातृभाषेत होणार
राष्ट्रीय शैक्षणिक संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवणार आहे. याशिवाय जेईईच्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी याव्यतिरिक्त आणखी ९ स्थानिक भाषांमधून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोविड रुग्णालयाला आग; ५ ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या