28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयज्ञानवापी प्रकरण; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

ज्ञानवापी प्रकरण; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

एकमत ऑनलाईन

वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय वाराणसी कोर्टाने दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. ज्ञानवापी प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देत सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी निकाल देताना कोर्टाने म्हटले की या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्या योग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमिटीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या ५ पैकी ३ फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ ४० पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता.

२२ सप्टेंबरला सुनावणी
ज्ञानवापी मशीद खटल्यात हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आणि दावा कायम ठेवण्यायोग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा हिंदू समाजाचा विजय आहे.

लोकांनी शांतता राखावी
याचिकाकर्ते सोहनलाल आर्य यांनी म्हटले आहे की, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी आहे. ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे. हा तमाम हिंदूंचा विजय आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या